आमचे उद्दिष्ट

शिव उद्योग संघटनेचा मुख्य उद्देश स्थानिक महिलांना, युवकांना, शेतकरी व गौपालकांना स्वावलंबी बनविणे, लघुउद्योगाचे मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यावसायिक रूप देणे हे आहे.

मुख्य गोष्टी

  • स्थानिक महिला उद्योजकांना प्रशिक्षण आणि मदत.
  • उत्पादन विक्री व मार्केटिंग सल्ला.
  • स्थायी रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकास.

आमची समिती

शिव उद्योग संघटना अध्यक्ष श्री. दीपक काळीद
श्री. दीपक काळीद
अध्यक्ष
शिव उद्योग संघटना सरचिटणीस श्री. प्रकाश ओहळे
श्री. प्रकाश ओहळे
सरचिटणीस
शिव उद्योग संघटना उपाध्यक्ष श्री. गोकुळ लगड
श्री. गोकुळ लगड
उपाध्यक्ष
शिव उद्योग संघटना उपनेत्या, कार्याध्यक्ष डॉ. शिल्पा देशमुख
डॉ. शिल्पा देशमुख
उपनेत्या, कार्याध्यक्ष
शिव उद्योग संघटना महाराष्ट्र राज्य संघटिका ॲड. स्मिता देवकर पाटील
ॲड. स्मिता देवकर पाटील
महाराष्ट्र राज्य संघटिका
शिव उद्योग संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्री. भास्कर चव्हाण
श्री. भास्कर चव्हाण
महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य
शिव उद्योग संघटना महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. संजय सावंत
श्री. संजय सावंत
महाराष्ट्र राज्य समन्वयक
कार्याध्यक्ष श्री. हनुमंत ताम्हणकर
श्री. हनुमंत ताम्हणकर
कार्याध्यक्ष
खजिनदार श्री. राजेंद्र यादव
श्री. राजेंद्र यादव
खजिनदार

संपर्क

सरचिटणीस : श्री. प्रकाश ओहळे

☎️ मोबाईल: +91 97020 58930

✉️ ई-मेल:

oneshivudyog@gmail.com

संघटनेचा परिचय

शिव उद्योग संघटनेची स्थापना ०४ नोव्हेंबर २०२३ रोजी झाली आहे. महाराष्ट्रातील युवक, महिला, शेतकरी आणि गौपालक यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे.

संघटनेतर्फे सदस्यांना उद्योग कल्पना, प्रशिक्षण, मार्केटिंग व वितरण व्यवस्था, तसेच कृषी व शेतीपूरक व्यवसाय (दुग्धोत्पादन, देशी गौवंश आधारित शेती, पंचगव्य उत्पादने इ.) याबाबत मार्गदर्शन केले जाते. बचत गट व छोट्या उद्योजकांचे दर्जेदार उत्पादन “माझा महाराष्ट्र – The Essence of Maharashtra” या ब्रँडमार्फत बाजारात पोहोचवण्याचे काम आम्ही करतो.

रोजगार, स्वयंरोजगार आणि व्यवसाय विषयक मार्गदर्शनासाठी आमचे YouTube चॅनल शिव उद्योग संघटना अवश्य पहा.

कार्यक्रम आणि योजना

  • रोजगार: रोजगार मेळावे, नोकरी मार्गदर्शन.
  • आरोग्य व्यवसाय: आरोग्य केंद्र व्यवसायासाठी प्रशिक्षण व मदत.
  • शिक्षण: स्पर्धा परीक्षा केंद्र व मोफत सेमिनार.
  • योग: आयुष्यमान मंत्रालय योग शिक्षक कोर्स मोफत प्रशिक्षण.
  • महिला रोजगार: पाळणाघर, वस्त्र विक्री आणि कार्यशाळा.
  • भोजन: सेंट्रल किचन व टिफीन व्यवसाय सुरू करणे.
  • कृषी: शेतमाल व बाजार व्यवस्था, प्रत्येक विधानसभेत ४ गाड्या.
  • मिडिया व मार्केटिंग: उत्पादने आणि प्रकल्पांची मार्केटिंग व्यवस्था.
  • इव्हेंट: रोजगार व स्वयंरोजगार इव्हेंट्स.
  • पर्यटन: स्थानिक पर्यटनातून व्यवसाय संधी.
  • विवाह: विवाह जुळविणे.

लवकरच सुरू होणारे प्रकल्प

शिव उद्योग संघटनेमार्फत पुढील काही महत्वाचे प्रकल्प नियोजनात आहेत.

  • माझा महाराष्ट्र शॉपी व चपाती प्रोजेक्ट: स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ देण्यासाठी शॉपी व फूड प्रकल्प. इन्व्हेस्टमेंट व भागीदारीसाठी लवकरच नोंदणी सुरू होईल.
  • बांधकाम व्यवसाय समिती: ज्येष्ठ नागरिक, उद्योजक आणि बांधकाम क्षेत्रात रस असलेल्या सदस्यांसाठी स्वतंत्र समिती व कंपनी/ट्रस्ट स्थापन करण्याचे नियोजन.
  • ब्युटिशियन व मेकअप प्रोजेक्ट: प्रशिक्षित ब्युटिशियन व मेकअप आर्टिस्ट यांना रोजगार आणि कॉन्ट्रॅक्ट कामे उपलब्ध करून देण्याची योजना.
  • कृषी, गोशाळा व पंचगव्य प्रकल्प: देशी गाई, गोशाळा, शेण-गोमूत्र, पंचगव्य उत्पादने, एग्रो टुरिझम आणि वृद्धाश्रम यांचा समन्वयित प्रकल्प तयार होत आहे. ज्यांच्याकडे २ एकरपेक्षा जास्त जागा आहे त्यांनी श्री. गोकुळ लगड सरांशी संपर्क साधावा – +91 70965 72126 .

ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवसाय संधी

सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आत्मसन्मान आणि सक्रिय जीवनशैली जपत काम करण्याच्या काही विशेष व्यवसाय संधी आम्ही तयार करत आहोत. या संधींमध्ये लवचिक वेळापत्रक, कमी शारीरिक श्रम, घरबसल्या करता येणारे काम, अनुभवाचा उपयोग आणि अतिरिक्त उत्पन्न मिळण्याची संधी असेल.

  • आपल्या वेळेनुसार आणि ऊर्जेनुसार काम करण्याची मुभा.
  • कमी शारीरिक श्रम, जास्त मानसिक समाधान.
  • अनुभवाचा उपयोग करून समाजासाठी योगदान.
  • आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक जोडणी.

ह्या प्रकल्पाचे नेतृत्व करण्याची इच्छा असणाऱ्या ज्येष्ठांनी दीपक काळीद सरांना थेट संपर्क साधावा. तन, मन, धन अर्पण करण्याची तयारी असेल तरच या विशेष टीममध्ये सामील व्हा.

वास्तूलक्ष्मी प्रोजेक्ट

वास्तूलक्ष्मी प्रोजेक्ट अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात किमान ५०,००० रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. कोकणातील तसेच उर्वरीत महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचे गावात घर, वाडी, फार्महाउस आहे पण निगा राखायला वेळ नसतो, अशा सर्व ठिकाणांची देखभाल, सफाई आणि पर्यटनासाठी सज्ज करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.

  • घर आणि वाडीची साफसफाई, वृक्षांची निगा, आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल.
  • पर्यटनासाठी योग्य असलेल्या घरांमध्ये होम स्टे / फार्म स्टे सुरू करण्याची योजना.
  • बचत गटांद्वारे व स्थानिक महिलांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती.
  • घरकाम करणाऱ्या महिला आणि पेशंट केअर साठी प्रशिक्षण देऊन “वास्तूलक्ष्मी” नावाची सन्मानजनक भूमिका तयार करणे.

या प्रोजेक्टमध्ये सहभागी होण्याची इच्छा असलेल्या महिलांनी व कुटुंबांनी वर दिलेल्या फॉर्ममध्ये “वास्तूलक्ष्मी प्रोजेक्ट” हा पर्याय निवडून नाव नोंदणी करावी.

शिव उद्योग संघटने मध्ये सामील व्हा

एकच ध्येय - रोजगार आणि व्यवसाय निर्मिती

शिव उद्योग संघटने मध्ये सामील होऊन सामाजिक काम करण्याची संधी मिळवा. खाली आपल्या माहिती सह फॉर्म भरून पाठवा व कोणत्या समितीत काम करण्याची इच्छा आहे तेही निवडा.

सोशल मीडिया

अलीकडील कार्यक्रम – फोटो

शिव उद्योग संघटनेतर्फे रोजगार व व्यवसाय संधी विषयक मार्गदर्शन मेळाव्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला. खाली काही क्षणचित्रे दिली आहेत.

WhatsApp वर संपर्क करा